श्री संत साईबाबा जन्मस्थळाचे संशोधक श्री वि.बा.खेर यांनी श्रीसाईबाबाचा जन्म,जन्मस्थान,त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमि ह्यांचे गुढ उकलण्याच्या हेतूने सपत्नीक पाथरी गावास जून १९७५ मध्ये भेट दिली. तेथील लोकांबरोबरील संभाषणात सहजपणे मिळालेले धागेदोरे पकडून त्यांचा अथक पाठपुरावा केला,चिकाटीने पुरावा जमा केला.आणि धिमपनाने एकत्र जोडला.सर्व पुरावा अशा दर्शवितो की,पाथरी हे श्री साईबाबांची जन्मभूमी असली पाहिजे व तेथील यजुर्वेदी देशस्थ ब्राम्हणाच्या भुसारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला असावा हि सर्व माहिती संकलित करण्याचा हेतू म्हणजे श्री बाबांच्या पुढील घटनांची संगत लावणे हाच होता त्या हेतूने त्यांनी पाथारीस भेट दिली.

श्री संतसाईबाबाचे स्वरूप,त्यांचापोशाख,त्यांच्या खानपानाच्या सवई,.शिर्डीतील त्यावेळची परिस्थिती आणि त्यांचे जन्मस्थान व कुटुंब या संबंधी मांडलेली निरनिराळे मते श्री खेर साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहिलेली आहेत.श्री साईबाबांची शरीरयष्टी भरभक्कम होती.ते अजानबाहू व मध्यम उंचीचे होते.त्यांचा वर्ण गोरा,केतकी रंगाचा होता,परंतु त्यांचे डोळे पाणीदार असल्यामुळे त्यांचे पहिलीच छाप त्यांच्या डोळ्यामुळे पडत असे.त्यांच्या डोळ्यात एवढे तेज व तीक्ष्णता होती की,त्यांच्या डोळ्यांकडे पाहणा-यास असे वाटे,की आपले अंतःकरण त्यांच्यापुढे संपूर्णपणे उघडे आहे.त्यांचे कान टोचलेले होते आणि त्यांची सुंता केलेली नव्हती.यावरून ते हिंदू असावेत असे अनुमान निघतो.परंतु त्यांचा पोशाख फकीरासारखा होता व ते एका जुन्या पडक्या मशिदीत राहत जिला ते द्वारकामाई असे म्हणत.मशिदीत धुनी होती व तिच्यात अग्नी सदैव पेटत असे.भक्तांना शंख वाजवून व घंटानाद करून त्यांची थाटात पूजा करण्याची सुद्धा मुभा असे.
मशिदीच्या बाहेर अंगणात तुळशी वृंदावन असे.त्यांचे हिंदू भक्त अंगणात रामनवमीच्या उत्सव साजरा करत व साईबाबा त्यात मोठया आनंदाने सामील होत,तसेच स्थानिक,मुसलमानांना त्याच दिवशी संदल मिरवणूक काढण्यास त्यांची हरकत नसे. आहाराच्याबाबातीत ते उदार मताचे होते. अल्ला मालिक हे शब्द त्यांच्या जिभेवर नेहमीच असत.तरीही राम,कृष्ण,गणेश,शिव,हनुमान,दत्तात्रेय अथवा भक्ताचे ह्या स्वरुपात ते भक्तांना दर्शन देत. त्यांना भगवद्‌गीतेचे सूक्ष्म व गाढ ज्ञान होते हे त्यांच्यात व नानासाहेब चांदोरकाराबरोबर झालेल्या गीतेच्या संवादात केलेल्या टीकेवरूनन स्पष्ट होते. परंतु ते मुसलमानाबरोबर कुराणाचा पहिला सुरा (अध्याय) म्हणंत असत. त्यांना ब-याच भाषा अवगत होत्या, परंतु हे प्रभुत्व त्यांनी केव्हा व कसे प्राप्त केले हे कोणास ठाऊक नाही.
एकंदरीत ते एक लोकोत्तर व्यक्ती होते आणि त्यांची घडण प्राचीन प्रख्यात संत योग्याप्रमाणे झाली होती असे म्हणता येईल.त्यांचावर सुफी पंथाचा गहरा प्रभाव पडला असावा असे दिसते.यासंबधी हे लक्षात ठेवले पाहिजे कि ,कोर्टाने नेमलेल्या चौकशी अधिका-यासमोर त्यांनी एकदा साक्ष दिली ,तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना साईबाबानी असे सांगितले कि,त्यांचे धर्मतत्व अथवा वैचारिक प्रणाली कबीर हि होती.सॉलिसिटर हरी सीताराम दिक्षित,मुंबई विधान मंडळीचे माजी सभासद हे साईबाबांचे एक अत्यंत नि:स्वार्थी भक्त होते.श्री साईसच्चरीत्रात लिहिलेल्या अध्यायात ते म्हणतात,महाराज मुळ कोठील राहणारे व त्यांची मातापितरे कोण?,या विषयी खात्रीलायक माहिती मिळत नाही.

एवढे मात्र खचित दिसते की,महाराजांचा मोंगलाईशी संबंध बराच असावा. महाराजांचे बोलण्यात शेलू ,(सेलू), जालना, मानवद (मानवत), पाथरी, परभणी, नौरांगाबाद, (म्हणजे औरंगाबाद), बीड ,बेदर ,या मोंगलाईच्या गावांचा वारंवार उल्लेख येत असे.एकदा एक पाथरीचा गृहस्थ महाराजांचे दर्शनाला आला होता.त्याला महाराजानी पाथरीची हकीकत विचारून तेथील बहुतेक ठळक ठळक गृहस्थांची नावे घेऊन त्यांचे विषयी चौकशी केली. यावरून महाराजांना पाथरीची विशेष माहिती होती. असे मानता येईल. पण त्यांचा जन्म तेथलाच असावा असे खात्रीलायक म्हणता येत नाही.तसेच महाराज मुळचे ब्राह्मण होते की,ते जन्मतःच मुसलमान होते हे निश्चयात्मक सांगता येत नाही. महाराजांचे एक फार जुने भक्त म्हाळसपाती असे म्हणत की,साईबाबानी त्यांना एकदा सांगितले होते की,त्यांचा साईबाबांचा जन्म पाथरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला व लहानपणीच त्यांच्या आईवडिलांनी त्यांना एका फकिरास सुपुर्द केले साईबाबानी हे सांगितल्यानंतर थोडयाच दिवसांत पाथरीचा एक गृहस्थ काही कामासाठी शिर्डीजवळच्या को-हाळा नामक एकागावी आला होता.तो शिर्डीस आला असतांना पाथरीच्या ब-याच रहिवाशांची चौकशी त्याच्या नावनिशीवार साईबाबानी केली,भक्त म्हाळसापती हा सरळ स्वभावाचा सत्यववक्ता होता व त्याच्या वैरागामुळे साईबाबासुद्धा त्याला फार मान देत असत.आपल्या आईवडलाविषयी कोणत्याही प्रश्नांना साईबाबा पुष्टी देत नसत आणि म्हणत,पुरुष माझा पिता माय माझी माता आहे.आयुष्यभर संशोधन करणा-या साईबाबांच्या एका चरित्र लेखकाने असे म्हटले आहे की, साईबाबांचा जन्म हे एक गुढ आहे आणि त्याबद्दल प्रत्यक्ष ज्ञान असलेला एकही मनुष्य मला भेटलेला नाही.वामन प्राणगोवींद पटेल,सॊलीसिटर हि सुद्धा अशी एक व्यक्ती आहे कि जिचा शब्द ह्या बाबतीत महत्वाचा मानला पाहिजे.१९५३ साली त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी साईशरणानंद या नावाने ओळखले जातात.त्यांनी स्वीकारलेल्या नव्या नावावरून त्यांना साईबाबांच्याबदल किती आदर व भक्ती हे स्पष्ट होते. प्रस्तुत विषयावर त्यांचा शब्द मानावयाचा असला तर त्यांचा या बाबतीतील अधिकार, त्यांनी गुजराती भाषेत लिहिलेल्या साईबाबाच्या चरित्रावरून समजून घेतला पाहिजे.वामन प्राणगोवींद पटेल ह्यांचा जन्म ५ एप्रिल ,१८८९ मध्ये झाला व ते २५ ऑगष्ट १९८२ पर्यंत ह्यात होते.१९१० साली मुंबईच्या एलिफ़िन्स्टन कॉलेजातून तत्वज्ञान हा विषय घेऊन ते उत्तीर्ण झाले आणि १९१२ मध्ये त्यांनी एल.एल.बी.हि पदवी प्राप्त केली.

स्वामी विवेकानंदाप्रमाणे त्यांनाही परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची मनीषा होती.ह्याकारीता ते पुष्कळ साधुना भेटले ,परंतु त्यांची इच्छा कोणीच पुरी करू शकला नाही. शेवटी त्यांच्या वडिलांनी साईबाबांना भेटण्यास त्यांनासुचविले .त्याप्रमाणे १०डिसेंबर १९११रोजी ते मुंबईहून निघून कोपरगावला दुस-या दिवशी गेले व तेथून टांग्याने शिर्डीस पोहोचले.टांगा लेंडीपर्यंत आला तेव्हा टांगा थांबवून टांगेवाला म्हणाला, ते बघा, साईबाबा समोरून जात आहेत. वामनभाई तत्काळ टांग्यातून उतरून साईबाबाच्या पाया पडले आणि काय आश्चर्य! साईबाबा त्यांना म्हणाले, परमेश्वर आहे. तो नाही असे का म्हणतोस? साईबाबांशी झालेल्या स्वतःच्या पहिल्या भेटीचा वृतांत स्वामी शरनानंदानी प्रस्तुत लेखकास सविस्तरपणे निवेदन केले.
त्या भेटीने वामनभाईचे समग्र जीवनात अमुलाग्र बदल होणार होता! त्यांचे मनातील सर्व संदेह पूर्णपणे विराम पावले आणि त्यांना वाटले की, ज्यांचा सदगुरू म्हणून संपूर्ण स्वीकार करावा असा गुरु आपणास मिळाला आहे. पुढे १९१३ च्या उन्हाळ्याच्या सुटीत शिरडीस आले असता त्यांना साईबाबांनी अकरा महिने शिर्डीत ठेवून घेतले आणि एके दिवशी त्यांनी न मागताच शिर्डी सोडण्याची आज्ञादिली.ह्या शिर्डी येथील दीर्घ वास्तव्यात बाबा त्यांना भिक्षा मागण्यास पाठवीत.वामानभाई साईबाबाच्या दाट सान्निध्यात आले व बाबांनी मोठया प्रेमानी त्यांचे बापू असे टोपणनाव ठेवले.
पुढे यथावकाश वामनभाई हे सॉलिसिटरची परीक्षा उत्तीर्ण झाले व तो व्यवसाय करु लागले.परंतु त्यंची खरी आवड नैतिक व आध्यत्मिक गोष्टीबद्धल होती.त्यांनी अहमदाबाद येथील सस्तु साहित्य वर्धक कार्यालयासाठी विपुल लेखन केले आहे.त्याच प्रमाणे मूळ मराठीतील संपूर्ण श्री साईसचरीत्राचा साध्या व सरळ काव्यात गुजरातीत अनुवाद केला आहे. ही गोष्ट वादातील आहे की, साईबाबा स्वत:ला ब्राम्हण मानीत व तर कुणी ते ब्राम्हण नसल्याचे सुचविले तर त्यावर ते नाराज होत. १९१२साली वामनभाईच्या वडिलांना जलोदर झाला व त्यातून ते बाहेर पडण्यची शक्यता नव्हती. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात वामनभाई शिर्डीला गेले होते. त्यांच्या मनातील विचार साईबाबानी तात्काळ ओळखून त्याना आपल्या वडिलांस शिर्डीस घेउन येण्यास सांगितले, परंतु लगेच दुस-या क्षणी साईशरणानंदाच्या मनात विचार आला की, माझे सनातनी वृत्तीचे वडील मुसलमान समजले जाणा-या फकिराकडे येतील का? म्हणून बाबा तात्काळ म्हणाले, काय, मी ब्राम्हण नाही ?

स्वामीजींना असे पण लिहून ठेवले आहे की,बाबांचा सर्वात जुना भक्त म्हाळासापती यालाबाबानी स्वतःच असे सांगितले होते की, त्यांचा जन्म एका देशस्थ युजर्वेदी ब्राह्मण कुळात झाला आणि लहानपणीच त्यांना एका फकिराकडे सुपुर्द करण्यात आले होते.स्वामी साईशरानानंद पुढे असे म्हणतात की,एकदा संभाषणात बाबांनी स्वतःच त्यांना असे सांगितले होते की ते आठ वर्षाचे असतांना त्यांनी आपल्या घरादाराला,आईवडिलांना सोडून गंगेकाठी (बाबा गोदावरीला गंगा म्हणतात) आले.साईबाबांच्या जन्मकाहानीचे वर्णन सुमन सुंदर यांनी एका लेखात केलें आहे.प्रस्तुत लेखकाला ती माहिती माधवनाथ नावाच्या साधुपुरुषाने सांगितले असे त्यांचे म्हणणे आहे.त्या लेखाचा सारांश स्वामी साईशरानानंद ह्यांनी जे साईबाबांचे गुजरातीत चरित्र लिहिले आहेत्यांच्या सोळाव्या पानावर आहे.त्यात असे म्हटले आहे की,पाथरी येथील एका यजुर्वेदी ब्रह्मणास तीन मुलगे होती,त्यापैकी सर्वात वडील मुलगा म्हणजे साईबाबा होते.ज्यावेळी साईबाबा पाच वर्षाचे होते त्यावेळी त्या ब्राह्मणाकडे एकफकीर आला व त्याला म्हणाला, माझे मला परत दे त्यावर ब्राह्मणाने उत्तर दिले माझ्याजवळ असलेले सर्व तुमचेच आहे.त्यामुळे लगेच त्या फकिराने त्या ब्राह्मणाच्या मोठया मुलाला मागून घेतला व त्याला घेऊन तो निघून गेला.चार वर्षांनी तो फकीर परत आला आणि त्या ब्राह्मणाच्या संमतीने त्या मुलाला आणखी तीन वर्षासाठी नेले.वयाच्या बाराव्या वर्षापासून अठराव्या वर्षापर्यंत बाबा अज्ञातवासात होते आणि एकोणीस वर्षाचे झाल्यानंतर ते शिर्डीत कडूनिंबाच्या वृक्षाखाली प्रगट झाले.

श्री वि.बा.खेर १९७५ मध्ये पाथरीततील प्रसिद्ध वकील कै.श्री दिनकरराव वासुदेवराव चौधरी यांच्या घरी मुक्कामास होते.दिनांक २१ जूनला संध्याकाळी ते सहज माडीवरील पुढच्या पडवीत गप्पा मारीत बसले असता दिनकरराव म्हणाले, ब-याच वर्षापूर्वी माझे वडील वासुदेवराव, भाऊ भुसारी ह्या नावाचा गृहस्थ गढीत माधुकरी मागण्यासाठी प्रवेश करीत असता त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाले पाह काय वाईट स्थिती झाली आहे साईबाबाच्या एका वंशजाची ! दुस-या दिवशी दिनकररावांचे काही मुसलमान अशील त्यांच्याकडे आले होते ते म्हणाले की ,त्यांच्या माहितीप्रमाणे साईबाबांचा जन्म पाथरी येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.परंतु ते लहान असतानाच एक अवलिया त्यांना घेऊन गेला होता आणि पुढे काय झाले ते मात्र त्यांना ठाऊक नव्हते.ह्या त्यांच्या बोलण्यामुळे ह्या बाबतीतील आणखी एक धागा हाती आला म्हणुन पाथरी गावातील सर्व ब्राह्मण कुटुंबाची यादी करण्याच्या तयारीस लागले.

पाथरी गावातील सर्व ब्राह्मण देशस्थ आहेत.त्यातील काही ऋग्वेदी तर काही यजुर्वेदी आहेत. ह्याशिवाय अन्य कोठल्याही पोटभेदाची ब्राह्मण कुटुंबे पाथरी गावात नाहीत .त्यांनी घरोघरी हिंडून कुटुंबातील वडील माणसाकडून जी माहिती गोळा केली त्यावरून असे कळले कि, ब्राह्मण कुटुंबापैकी बहुतेकांचे कुलदैवत माहुरची रेणुकादेवी किंवा आंबेजोगाई येथील योगेश्वरी हे आहे. ह्याला अपवाद एकच दिसला व तो म्हणजे भुसारी कुटुंबाचा.हे कुटुंबही मध्यादिन शाखेचे शुक्ल्य यजुर्वेदीच आहे व त्यांचे गोत्र कौशिक आहे.पण त्यांचे कुलदैवत मात्र पाथरी गावाच्या सीमेवरच्या कुंभारवाडी अथवा पंचवाबडीचा हनुमान आहे.हि गोष्ट कळल्यावर विचारांना अगदी नवीन दिशा दिसली तात्काळ वैष्णव गल्लीत गेले व भूसारींच्या पडक्या घराचे अवशेष घर क्रमांक ४-४३८-६१ अत्यंत आदरपूर्वक पहिले आणि कुंभारवाडी येथील हनुमानाच्या दर्शनास गेले.पाथरी गावच्या वेशीवर लेंडी नावाचा ओहोळ आहे व त्यावरून शिर्डीच्या लेंडीवागेची आठवण झाली. ह्या दोहोतील संयोग स्पष्ट आहे. मराठवाड्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रचारात असलेली मराठी बोली व साईबाबा ची मराठी भाषा यात पुष्कळच साम्य आढळले. मराठवाड्यातील सर्व स्तरावरील लोक एकाच भाषा बोलतांना आढळतात. श्री साईबाबांचे जन्माचे वर्ष ही निश्चितपणे कोणालाच माहित नाही. त्याच प्रमाणे त्यांचे शिर्डीत केव्हा आगमन झाले ह्याबद्दलही मतभेद आहेत.श्री साईसच्चरिताप्रमाणे ते शिर्डीला प्रथम १८५४ साली आले या मताचे बी.व्ही. नरसिंहस्वामी आहेत व एम.व्ही.प्रधान त्यांच्याशी सहमत आहेत.१५ ऑक्टोंबर १९१८ ला त्यांनी महासमाधी घेतली हे मात्र सर्वांना मान्य आहे. आणि त्यांचे जे फोटो आहेत त्यावरून त्यांचे वयाचे अनुमान तेवढे आपण करू शकतो.

तर मग साईबाबांचा जन्म पाथरी येथील भुसारी कुटुंबात झाला असे रास्त खात्रीने आपण म्हणू शकतो ? पाथरी येथील एका प्रसिद्ध नागरिकाने ह्या विषयीची माहिती आपल्या मुलाससांगितली.त्याशिवाय अन्य काही पुरावा उपलब्ध आहे का? हापुरावा गोळा करण्यासाठी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचे श्री खेर यांनी ठरविले.प्रोफेसोर रघुनाथ महारुद्र भुसारी यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार सुरु केला.पाथरी येथील घराचे तेच मालक होते.प्रारंभी ओस्मानिया विश्वविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते व संस्कृत पण शिकवीत.नंतर ते सरकारी महाविध्यालायाचे प्राचार्य झाले व त्याच पदावरून १९५९ साली सेवानिवृत्त होऊन हैद्राबाद येथेच स्थायिक झाले.ते आठ वर्षाचे असतांना त्यांचे वडील मरण पावले.

बाराव्या वर्षी त्यांनी पाथरी सोडली व जिल्ह्याच्या ठिकाणी परभणी येथील पुढील शिक्षणासाठी गेले.मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते हैद्राबादला गेले व तिस-या क्रमांकाने बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.ह्यामुळे त्यांना कलकत्ता विश्वविद्याललयाची एम.ए.साठी शिष्यवृत्ती मिळाली आणि तीही परीक्षा १९२६ मध्ये संस्कृत व पुराण वस्तुसंशोधन हे विषय घेवून ते यशस्वी झाले.
तेथे त्यांनी डॉ.देवदत्त रामकृष्ण भंडारकर यांच्या हाताखाली भारताचा प्राचीन इतिहास व संस्कृती यांचा अभ्यास केला.त्यानंतर विश्वविद्यालयाची एम.ए.ची परीक्षा मराठी हा विषय घेऊन ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले.ह्यामुळे त्यांना कलकत्ता विश्वविद्यालयाची एम.ए. साठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ती हि परीक्षा १९२६ मध्ये संस्कृत व पुराण वस्तुसंशोधन हे विषय घेऊन ते यशस्वी झाले त्यानंतर नागपूर विश्वविद्यालयाची एम.ए.ची परीक्षा मराठी हा विषय घेऊन ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले.प्रो भुसारी म्हणतात की,कोनेरदादा हे त्यांचे पहिले ज्ञात असलेले पुरुष नंतर दोन पिढ्यांची काही माहिती उपलब्ध नाही,परंतु त्यानंतरच्या तीन पिढ्यांचा वंशवृक्षासाठी इथे क्लिक करा. प्रा.भुसारी पुढे असे म्हणतात की,लहानपणी त्यांच्या आजीने त्यांना असे सांगितले होते की, हरिभाऊ, अंबादास व बलवंत हे सर्व पाथरी गाव कायमचे सोडून गेले होते.ह्यापैकी हरिभाऊ हे परमेश्वराच्या शोधात गेले असावेत.परंतु इतर दोघे मात्र नशीब काढण्यासाठी घराबाहेर पडले.पुढच्या पिढीतील परशुरामबापुंनी देखील मंजार्थ (मंजरथ) ह्या ठिकाणी संन्यास घेतला होता,हे ठिकाण बीड जिल्ह्यातील गोदावरी व सिंधफणा ह्या नद्यांच्या संगमावर आहे. परशुरामबापूंचा मुलगा भाऊ हा फारसा शिकलेला नव्हता व तो गरिबीतच मृत्यु पावला. एवढा पुरावा पुरेसा आहे. मग भुसारी कुटुंबातील हरिभाऊ भुसारी हे तर साईबाबा असावेत का? येथवर मांडलेले प्रमेय संभवनीय आहे. ह्याची चर्चा संसोधकानी एका अनुभवी वकीलाबरोबर व एका प्रसिद्ध इतिहास तज्ञाबरोबर एकाचवेळी केली. त्यावेळी त्यांनी असे मत व्यक्त केले की, हे शक्य कोटीतील आहे.म्हणून त्यांनी आता त्याबदल आणखी काही न लिहिता ह्या विषयाचा निवाडा करण्याचे काम वाचकांवर सोपविले.

 
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.