पांडवाच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र असून जुने नाव पार्थपूर,श्रीसंत साईबाबा यांचे जन्मस्थान माजी मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचे चिरंजीव श्री विश्वास बाळासाहेब खेर व सौ.इंदिरा विश्वनाथ खेर यांच्या पंचवीस वर्षाच्या संशोधनातून श्री संत साईबाबाच्या जन्मस्थानाची जागा निश्चित झाली.श्रीसंत साईबाबांचे संपूर्ण नाव हरिभाऊ परशुराम भुसारी यांचा जन्म पाथरी येथील वैष्णव गल्लीतील एका माध्यंदिन शाखेच्या शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला.

जन्मस्थानाच्या वास्तूवर भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. १९ ऑक्टोंबर १९९९ च्या विजयादशमीस श्री साईबाबाची साडेपाच फुटाची ब्रॉंझच्या सोनेरी रंगाच्या मूर्तीची स्थापना केली असून बाबाच्या चांदीचे आवरण असलेल्या संगमरवरी पादुका पुजेसाठी बसविण्यात आल्या आहेत. गाभा-याचे पुढे विस्तीर्ण सभामंडप आहे. मंदिराच्या तळ घरात बाबाच्या घराण्याच्या पुरातन वास्तूतील काही शेष भाग होता,तो भाग जशाच्या तसा बंदिस्त करून सुरक्षित ठेवलेला आहे.यात जुनी दगडमातीची इमारत असून हा भाग बाळंतखोली व अन्य भाग आहे.

या उत्खननात सापडलेली पुजेची उपकरणे व मारुतीची मूर्ती,मातीची घागर इत्यादी वस्तु त्याच भागात एका ठिकाणी व्यवस्थित ठेवल्या आहेत.तळघरात भव्य ध्यानमंदिर बांधलेले आहे. बाबाचे सहाफुट उंचीचे सुंदर यथारूप तैलचित्र ठेवले असून त्याच्या एका बाजूस श्री स्वामी साईशरणानंद व दुस-या बाजूस श्री बल्बबाबा यांची तैलचित्रे ठेवण्यात आली आहेत.मंदिरापासून पश्चिमेस साधारण दोन कि.मी.अंतरावर श्रीसाईबाबांच्या घराण्याचे कुलदैवत कुंभारवाडी(पंचबावडी) हनुमान मंदिर आहे.शेजारीच प्राचीन पुष्करणी बारव तिर्थ आहे.

री साई मंदिरा जवळच प्राचीन सोमेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, श्री प.पु.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्थापन केलेले दत्त मंदिर दर्शनीय,योगेश्वरी मंदिर,साई मंदिराच्या दक्षिण भागात साधारण दोन कि.मी अंतरावर किल्ला,पांडवाचे वटे प्रसिद्ध.तसेच शहरातील लिंगायत मठात श्री संत कांचबसवेश्वर महाराज यांनी ३०० वर्षापूर्वी जिवंत समाधी घेतली असे मानले जाते. इतर मंदिरे प्राचीन बालाजी मंदिर, गणपती मंदिर, योगेश्वरी मंदिर, विठ्ठल मंदिर आहे.

 
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.