स्थान अक्षांस (उत्तर) १८.५८ अंश ते २०.०२ अंश
रेखांश    ७६.०४ अंश ते ७७.४२ अंश
जिल्ह्यातील सर्वात उंच भाग  ५७९ मी 
सर्वात कमी उंचीचा भाग  ३६६ मी
जिल्हयाचे हवामान उष्ण व कोरडे आहे. परभणी जिल्ह्यात उन्हाळा कडक असतो
तापमान कमाल ४२.२० से.किमान १३.४० सें.
पर्जन्यमान ७७३ मिमि सरासरी २००५ प्रमाणे
प्रमुख कृषि उत्पन्न ज्वारी,कापूस मूग,तूर,तांदूळ,भुर्इमुग,सोयाबीन,गहू,कडप,करडर्इ,हरभरा,केळी आणि ऊस
जिल्ह्याचे ठिकाण 

परभणी

क्षेत्रफळ ६,५४१ चौ.कि.मी.
उपविभाग दोन- परभणी, सेलू
तालुक नऊ – परभणी,जिंतूर,पाथरी,सेलू,मानवत,गंगाखेड, सोनपेठ,पूर्णा व पालम
समुद्रसपाटी पासून उंची ४५७.५९ मी.
दळणवळणाची उपलब्ध साधने रेल्वे , रस्त
लोकसंख्या २००१ प्रमाणे
पुरूष : ७,८०,१९१
स्त्री : ७,४७,५२४
एकुण :१५,२७,७१५
साक्षरतेचे प्रमाण पुरूष : ७९.६० टक्के
स्त्री : ५२ टक्के
सिंचनाखालील क्षेत्र

४२ हजार हेक्टर मध्ये

सिंचन प्रकल्पाची संख्या मोठे १,मध्यम २, लहान ३४ महत्वाचे प्रकल्प येलदरी
प्रमुख व्यवसाय शेती,मासेमारी,खाणकाम,पशुपालन
प्रमुख उद्योग  जिनिंग प्रेसिंग,हातमाग ,यंत्रमाग,सूत गिरणी ,डाळ गिरणी, तेल गिरणी,साखर कारखाने,रासायनिक खत निर्मिती केंद्र, दूध प्रक्रिया केंद्र सिमेंटचे पार्इप निर्मिती केंद्र.
बोली भाषा मराठी ,हिंदी,ऊर्दु
लोककला

ग्रामीण स्त्रियांच्या ओव्या,प्रसंगोचित गाणी, लोककल, देवदेतांची स्तूतिपर गिते,पोवाडे,गवळण,गोंधळ आंध बंजारा,वासुदेव,गोंधळी वाघे,पोतराज, गोसार्क, परूणजोर,कलगीतुरा आणि शाहिरी इ.लोककलाचे जतन केलेले आढळते.

  जिल्ह्याची भोगोलीक माहिती:-
महाराष्ट्रात परभणी जिल्हयाचे दिनांक १ मे १९९९ रोजी विभाजन होवून परभणी व हिंगोली हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. परभणी जिल्ह्यात परभणी,जिंतूर,सेलू,पाथरी,गंगाखेड,पालम,पुर्णा सोनपेठ व मानवत असे नऊ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्याचे परभणी हे ठिकाण आहे.
स्थान व सिमा महाराष्ट्राच्या आग्नेय भागात परभणी जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पुर्वेस नांदेड व हिंगोली हे जिल्हे आहेत. पश्चिमेस बीड व जालना जिल्हे आहेत. दक्षिणेस लातूर व बडी हे जिल्हे आहेत तर उत्तरेस हिंगोली जिल्हा आहे.
लोकसंख्या इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याची लोकसंख्या १,५२,७७,१५ इतकी आहे.
भूरूपे परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात गोदावरी नदी वाहत असल्यामुळे तो भाग मैदानी आहे. तर उत्तर भाग अजिंठ्याचे डोंगर आहे व दक्षिण भागात बालाघाटाचे डोंगर आहेत. यामुळे परभणी जिल्ह्यात विविध भूयपे आहेत हे लक्षात येते.
  जिल्ह्याची प्राकृतीक माहिती:-
अजिंठ्याचा डोगराळ प्रदेश परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्यांचे डोंगर रांगा असून जिंतूर तालुक्‍याचा बहुतांश भाग या डोंगरांनी व्यापलेला आहे.
बाला घाटाचा डोंगराळ प्रदेश परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात बाला घाटाचे डोंगर रांगा असून त्यात गंगाखेड व पालम या तालुक्यांचा दक्षिण भाग व्यापलेला आहे.
मैदानी प्रदेश परभणी जिल्ह्यात गोदावरी नदी व तिच्या उप नद्यांनी अजिंठा व बालाघाटांच्या डोंगरामधील प्रदेश सखल (मैदानी) बनलेला आहे. यात सेलू,पाथरी,मानवत,सोनपेठ,पुर्णा,परभणी या तालुक्यांचा भाग व जिंतूर तालुक्याचा दक्षिण भाग तसेच गंगाखेड व पालम तालुक्यांचा उत्तर भाग या प्रदेशात समावेश होतो.
  जिल्ह्याच्या हवामानाची माहिती:-
परभणी जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळ्यात हवामान उष्ण व दमट असते तर डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हवामान थंड व कोरडे असते. मार्च ते मे मध्ये हवामान उष्ण व कोरडे असते. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून वाढत जाते. जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे.
  जिल्ह्यातील नद्या :-
गोदावरी परभणी जिल्ह्यातील मुख्यनदी गोदावरी असून ती पश्चिमेकडून बीड जिल्ह्यातून वाहत येते. व पुर्वे कडे वाहत जाते.यात पाथरी,सोनपेठ,गंगाखेड,परभणी,पालम,व पुर्णा या तालुक्यात ती वाहते पुर्णा ही तिची मुख्य उपनदी आहे.गोदावरीस दशिक्षणेकडून मासळी नदी येऊन मिळते.
पुर्णा परभणी जिल्ह्यात पुर्णा नदी जालना जिल्ह्यातून वाहत येऊन जिल्ह्याच्या उत्तर सिमेवरून दक्षिणेकडे वाहते. पुढे ती हिंगोली जिल्ह्यातून पुन्हा परभणी जिल्ह्यात प्रवेश करते.पुर्णा ही नदी कंठेश्वर येथे गोदावरी नदीस येऊन मिळते.
दुधना परभणी जिल्ह्यात दुधना नदी जालना जिल्ह्यातून वाहत येते व ते सेलू, परभणी या तालुक्यांतून वाहते.
कापरा नदी कापरा ही नदी अजिंठ्यांच्या डोंगर भागात उगम पावते व सेलू,जिंतूर ,परभणी या तालुक्यातुन वाहते.दुधना व कापरा ह्या पुर्णा नदीच्या उपनद्या आहेत.
  जिल्ह्याची नैसर्गिक साधन संपत्ती :-
परभणी जिल्ह्यात जिंतूर,पाथरी ,पुर्णा या तालुक्यांच्या काही भागात वने आढळतात.
वनस्पती परभणी जिल्ह्यातील वणात साग,धावडा,टेंभूर्णी,बेहडा,चिंच,कडुलिंब इत्यादी झाडे आढळतात.तर जिंतूर तालुक्यात रोशा नावाचे गवत आढळते.तसेच आंबा,बोर,सिताफळ इत्यादी फळे झाडे आढळतात.
प्राणी व पक्षी परभणी जिल्ह्यातील वणात भेकर,निलगाय,लांडगे,काळवीट,कोल्हे इत्यादी प्राणी आढळतात.तर कोकीळा,ससाना,पोपट,इत्यादी पक्षी आढळतात.पालम तालुक्यातील जांभुळबेट येथे मोर आढळतात.
पिके परभणी जिल्ह्यात खरीप व रबी यो दोन्ही हंगामात पिके घेतली जातात.
खरीप पिक:- काही पिके पावसाळ्याच्या सुरूवातीस पेरतात व त्यांची कापणी पावसाळ्यानंतर करतात त्यांना खरीप पिके म्हणतात.
खरीप पिके ज्वारी:- जिह्यात सर्वच तालुक्यात ज्वारी हे पीक होत असले तरी गंगाखेड तालुका हा ज्वारी उत्पादनाचा प्रमुख तालुका आहे.
कापुस:- परभणी जिल्ह्यात कापसाचे उत्पादन सर्वच तालुक्यात होते तरी परभणी,पुर्णा,पालम,जिंतूर हे तालुके कापुस उत्पादन करणारे प्रमुख तालुके आहेत.
मुग व तुर:- जिल्ह्यात सर्वच तालुक्यात या दाळींचे पीक घेतले जाते. यातही पाथरी,परभणी,गंगाखेड,सेलू व सोनपेठ हे तालुके मुग उत्पादन करणारे प्रमुख तालुके आहेत. तर तुरीचे पीक सर्वच तालुक्यात होते.
तांदुळ:- परभणी जिल्ह्यात परभणी,पुर्णा,गंगाखेड व पालम इ.तालुक्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते.
तेलबियांची पिके:- पाथरी व परभणी तालुक्यात भुइमुग व सोयाबीन ही तेलबियांची पिके प्रामुख्याने घेतली जातात.
रब्बी पिके काही पिके हिवाळ्यात पेरतात व त्याची कापणी ऊन्हाळ्याच्या सुरूवातीस करतात. त्यांना रब्बीपिके म्हणतात.
  ज्वारी:- प्रामुख्याने पाथरी,गंगाखेड,सेलू ,पालम व परभणी या तालुक्यात ज्वारीचे पिक रब्बी हंगामात घेतली जातात.
गहू:- हे पिक जवळपास सर्वच तालुक्यात घेतले जाते ती प्रामुख्याने सेलू,परभणी,जिंतूर व पुर्णा तालुक्यात जास्त पिके घेतली जातात.
करडई:- पाथरी तालुक्यात जास्त प्रमाणात पीक होते.
जवस:- जवसाचे पीक प्रामुख्याने पाथरी,परभणी,गंगाखेड तालुक्यात होते.
हरभरा:- पाथरी ,परभणी,गंगाखेड ,पालम या तालुक्यात जास्त पिक होते.
बागायती पिके ऊस:- पाथरी,सोनपेठ,परभणी,गंगाखेड,पुर्णा या तालुक्यात प्रमुख लागवड करतात.
केळी :-पाथरी व परभणी तालुक्यात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत या शिवाय द्रांक्षे ,मिरची, भाजीपाला, लसुन ही पिक सुध्दा घेतली जातात.
  जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था :-
परभणी जिल्ह्यातील वाहतूक ही रस्ते व लोहमार्गाने चालते.
रस्ते यात राज्य रस्ते च नव्यानेच (निर्मल ते कल्याण) राष्ट्रीय महामार्ग २२२ हा सुरू झाला आहे. या राष्ट्रीया महामार्गावर परभणी,मानवत ,पाथरी हे प्रमुख शहरे आहेत.
लोहमार्ग १) मनमाड ते काचीगुडा लोहमार्ग:-या रेल्वे मार्गावर सेलू,परभणी मानवतरोड,पुर्णा इत्यादी प्रमुख स्थानके आहेत.
२) परभणी ते परळी लोहमार्ग:-या लोहमार्गावर पोखर्णि नृसिंह,गंगाखेड हे प्रमुख स्थानके आहे.
३) पुर्णा ते खंडवा लोहमार्ग:-हा लोहमार्ग पुर्णेकडुन हिंगोली मार्गे अकोल्याकडे जातो.
परभणी स्थानक व पुर्णा स्थानक हही जंक्षने आहेत.
  जिल्ह्यातील छोटे उद्योग व व्यापार व्यवस्था :-

साखर उद्योग

पाथरी तालुक्यात देवनांद्रा परिसरात साखर कारखाना आहे. परभणी तालुक्यात,सोनपेठ तालुक्यात ,गंगाखेड तालुक्यात साखर उद्योग आहेत.
रासायनीक खतांचा कारखाना रासायनीक खतांचा कारखाना जिंतूर तालुक्यात आहे.
मत्सव्यवसाय गोदावरी,पुर्णा,दुधना या नद्यातून व जिल्ह्यातील लहान मोठ्या तलावातून मच्छीमार व्यवसाय चालतो. गंगाखेड तालुक्यात मासोळी या ठिकाणी मत्स्यबीज् उत्पादन कंद्र उभाले असून या ठिकाणी चिनी हॅचरी द्वारे जिरे निर्मिती केली जाते.झिंगा बीज संचयन करून मत्स्योपानदन वाढवणे हा उद्देश या योजनेचा आहे.
इतर या शिवाय जिल्ह्यात सुत गिरण्या, सिमेंटचे खांब बनविणे,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय , जिनींग प्रेसींग इत्यादी उद्योग चालतात.
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.