पांडवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीने पार्थपूर..पार्थापूर व कालांतराने पाथरी नाव धारण केले. हे गाव प्राचीन काळापासून अस्तित्वात असून श्री साईबाबांची जन्मभूमी पाथरीच आहे हे संशोधनातून सिध्द झाले आहे.श्री संत साईबाबां जन्मस्थान पाथरी या बाबत सन २००९ मध्ये "फुलोरा" श्री संत साईबाबां जन्मस्थान पाथरी दिवाळी विशेषांक आम्ही प्रकाशित केला होता..हाच अंक काही सुधारणाकरून www.saibababirthplace.org या संकेतस्थळ रूपाने आम्ही श्री साई चरणी अर्पण केला आहे.पाथरीच्या परिसराला ऐतिहासीक,धार्मिक व सांस्कृतिकवारसा लाभलेला आहे. आम्ही आमच्या शक्‍ती,ज्ञान व प्राप्त झालेल्या संदर्भ ग्रंथानुसार शक्‍य तेवढ्या बाबींचा उल्लेख या संकेतस्थळात करण्याचा प्रयत्न केला आहे.

"आकाश अंत न कळोनीही अंतरिक्षी
आकाश आक्रमिती शक्‍ती नूसार पक्षी"

ज्या प्रमाणे पक्षांना आकाशाचा अंत कोठे आहे,आहे किंव्हा नाही हे माहित नसते परंतू पक्षी ते त्यांच्या क्षमतेनुसार आकाशात भ्रमन करण्याचा प्रयत्न करतात अगदीत्याच प्रमाणे आमचा हा एक छोटासा प्रयत्न.

।।जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी ।।

जननी व जन्मभूमी ही आपणास स्वर्गाहुन प्रिय असते. त्याविषयी कुणाच्याही मनात नितांत श्रध्दा असते. तशी आमच्याही मनात आहे.आपली जन्मभूमी,तिची संस्कृती,सांस्कृतिक वारसा,ऐतिहासिक ठेवा या बाबत आदर असतोच त्या श्रध्दे मुळे,निष्ठेपोटीच आम्ही या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
या धार्मिक कार्याला श्री साई स्मारक समिती पाथरी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आपल्या कडू गोड प्रतिक्रिया आम्हास कळवाव्यात .

सदर संकेतस्थळांची माहिती ज्या संदर्भग्रंथा नुसार घेतली आहे. त्या संदर्भ ग्रंथांची यादी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लेखनी काढी अक्षर । परि तो तिच्यात नाही जोर ।
ती निमित्याकारण साचार । लेखनी रूपी कार्याला ।।


आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत.शेवटी करता करवा सेवाघडवून घेणारा तो साईच आहे.

।। जय साई ।।

-श्री गजानन दिगंबर पामे
-सौ.सारिका गजानन पाम
(प्राथमिक शिक्षक)
संपर्क 09689710330
gdpame@gmail.com

 
     
     
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pameweb.in संपर्क:९६८९७१०३३० E-mail :gajanan@pameweb.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.