गोंडगाव देवी |
श्री क्षेत्र गुंज पासुन तीन कि.मी.अंतराव देवीचे मंदिर असून हे जागृत देवस्थान आहे. |
श्री क्षेत्र ढालेगांव |
पाथरी तालुक्यातील गांव असून राष्ट्रीय महामार्ग २२२ निर्मल ते कल्याण या मार्गावरील पाथरी पासून पाच कि.मी.अंतरावर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे.येथे श्री पं.पू.महात्माजी महाराजांची समाधी आहे. येथील महर्षी वेद व्यास प्रतिष्ठाण द्वारा संचलित श्री समर्थ वेद पाठशाळा (विद्यालय) प्रसिध्द असून येथे चार वेदाचे अध्यापन होते. |
देवनांद्रा येथील देवीमंदिर |
पाथरी तालुक्यातील पाथरी ते सेलू मार्गावर पाथरीपासुन तीन कि.मी.अंतरावर गाव असून येथे पुरातन देवीचे मंदिर आहे.हे तुळजापुरच्या देवीचे अर्धपीठ असल्याचे मानले जाते. मंदिराच्या मागील बाजूस श्री रेणुका मातेचे मंदिर आहे. येथे एका देवऋषींची समाधी असून यामुळे या गावास देवनांद्रा असे नाव मिळाले. |
श्री क्षेत्र सिमुरगव्हाण |
पाथरी तालुक्यातील हे गांव पाथरी ते सेलू मार्गावर पाथरी पासून सहा कि.मि.अंतरावर असून श्री.पं.पू.नरेंद्राचार्यजी स्वामी महाराज नाणिज ता.जि.रत्नागिरी यांचा मठ प्रसिध्द आहे. |