पाथरी हे गाव महाभारत काळापासुन अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. महाभारतातील पांडवा पैकी पार्थ (अर्जुन) हा तिसरा पांडव लढाईच्या मोहिमेवर असतांना मुक्कामास येथे थांबला होता. त्याला हा परिसर आवडला म्हणून त्याने हा परिसर वसवला यावरूनच या गावच पार्थपुरी कालांतराने पार्थपूर व नंतर नावात अपभ्रंश होवून पाथरी हे नाव पडले.या गावात पार्थ मंदिर म्हणजेच अर्जुनाचे मंदिर होते असा उल्लेख आढळतो. याच गावात सुप्रसिद्ध संत श्रीधर या ग्रंथाने जेमिनी अश्वमेध हा ग्रंथ लिहिला.देवगिरी यादवांच्या सत्येच्या काळात पाथरी हे गणित शास्त्राचे एक विध्यापीठ होते.

नंतर बहामनी सत्येच्या राजवटीत पाथरी येथील तीम्मभट भैरो (भैरव) कुलकर्णी हा छळास कंटाळून तरुणपणीच विजापूरच्या आश्रयास गेला होता.इ.स.१४४० च्या आसपास विजापूरवर स्वारी झाली त्यात तो एका सरदाराच्या हाती लागला.(इमा-उल्ल -मुल्क ) त्याने तीम्मभटाला धरून सुलतान शाह हसनगुंग बहामणनी यांच्या पदरी ठेवले. त्या काळात धर्मांतर केले तर त्याला राज्यात मोठा हुद्दा मिळत असे. तेथे तीम्मभटाचे धर्मांतरकेले. त्याचे नाव बदलून मलिक हसन असे ठेवले गेले व त्याला राजाचा गुलाम म्हणून ठेवण्यात आले. सुलतानाने त्याची हुशारी पाहून त्यांचा जेष्ठ राजपुत्र महुमदच्या सोबत ठेवले.त्याचे सर्व शिक्षण जेष्ठ राजपुत्र महमुदच्या बरोबर झाल्यामुळे त्याने पार्शियन व अरबी भाषेवरही प्रभुत्व मिळविले.तीम्मभटाच्या वडिलांच्या भैरव या नावावरून त्याचे नाव मल्लिक भैरव असे पडले, परंतु राजपुत्राला ते नाव उच्चारण्यास कठीण वाटु लागले.त्यामुळे तिम्मभटास सर्व लोक भैरी म्हणत होते.२ मार्च १४८३ साली सुलतानाच्या मृत्युनंतर त्यांचा जेष्ठ राजपुत्र महमुद शहा सुलतान पदी अरुड झाला.परंतु महमुद शहाचे सुलतानपद हे केवळ नामधारी होते. खरी सत्ता मल्लिक हसन (तिम्मभट) याच्याकडेच होती. राज्यातल्या अमीर उमरावांचा सुलतानावरील विश्वास उडाला होता.मल्लिक हसने सुलतान महमुद करवी फतेउल्ला -इमाद-उल्ल मूल्क याची नेमणूक राज्याचे एक वजीर म्हणून केली आणि त्याचा मुलगा शेख अल्लाउद्दीन याला उत्तर व हाडाचा दुय्यम म्हणून नेमले.महमुदशहा सुलतानाने गादीवर आरूढ झाल्यावर मल्लिक हसन(तिम्मभटास) एक हजार घोडयाचा मससबदार बनवले. आपल्या अंगभूत गुणामुळे मल्लिक हसन कालांतराने वीस हजार घोडयाचा मसनबदार पदावर चढला. आणि त्याला मीर -ए –शिकार हा किताब त्याबरोबर असणा-या सर्व मान चिन्हासह देण्यात आला.त्यानंतर कुशबेग ह्या पदी त्याची नियुक्ती झाली.१९७१ मध्ये ओरिसाचा राजा मंगलराय विरुद्धच्या लढाईत मल्लिक हसनने अनुकरर्णीय शौर्य गाजवुन त्याचा पराभव केला व हमविरांला पुन्हा गादीवर बसविले.तसेच त्याने राजमंडरी काबीज करून कोंडवीडुचे अनेक किल्लेसर केले.वरील सर्व कामगिरी साठी त्याला अशरफ-ए -हुमायुन निझाम -उल्ल –मुल्क ह्या किताबाने गौरविन्यात आले व त्यांची तेलंगणाच्या सरलष्कर म्हणून नेमणूक झाली. त्याने संपूर्ण तेलंगण पादाक्रांत केले. कर्नाटकवर हल्ला करण्याची तयारी केली.नोव्हेंबर १४८० साली त्याने कोंडवीडुवर आपले वर्चस्व स्थापले त्या साठी त्याला मनसाद -ए-अली व उल्लुघ-ए-आझम हे किताब देवून राजमंडीच्या सुभेदार नेमण्यात आले.

त्यानंतर सुलताना बरोबर विजापूरचा राजा विरुद्ध मोहिमेवर गेला. व कांचीचा किल्ला जिंकला. परंतु राजधानीमध्ये चाललेल्या गोंधळाचा त्याला उबग आला आणि बिदर सोडून व-हाडाकडे निघून गेला.व-हाडला गेल्यानंतर त्याने पुन्हा बिदर मध्ये पाऊल ठेवले नाही. आणि राजाच्या कारभारात भाग ही घेतला नाही.बिदर मध्ये जी कारस्थाने चालली होती.त्यातूनच मल्लिक हसन (तिम्मभट) याचा खुन झाला.(हि घटना इ.स. १४८५ पूर्वी झाली असावी अशी नोंध आढळते.)आणि राजधानी मध्ये एकच गोंधळ उडाला याचा फायदा बहामानीच्या एक उमराव आणि बरीदशाही घराण्यचा एक संस्थापक काशीम बरीद याने घेतला व सर्व सत्ता बळकाटली.परिणामः राज्यातील प्रांताच्या सर्व सुभेदारांनी जवळ जवळ स्वातंत्र पुकारल्या सारखे झाले. मल्लिक हसन(तिम्मभट) च्या मृत्युनंतर त्याचे अधिकार त्याचा मुलगा मल्लिक अहमदकडे आले.१४९० मध्ये मल्लिक अहमदने अहमदनगर येथे निजामशाही,युसूफ अदिलखानाने अदिलशाही व इमात-उल्ल -मुल्क याने इमाजात शाही या तिघांनी राजघराण्याची स्थापना केली.इमादशाही घराण्याचे वा-हाडावर जवळ जवळ ८० वर्ष राज्य चालले.या मध्ये परभणी जिल्ह्याचाही समावेश होता.,मल्लिक अहमदशाहचा मृत्यू १५०९ मध्ये झाला त्याच्या जागी ब-हाण निजामशहा(तिम्मभट्टाचा वंशच)गादीवर आला. ब-हाण निजाम शहा अहमदनगरच्या गादीवर बसल्यानंतर त्याच्या नातलगांनी पाथरीचा समावेश आपल्या राज्यात करावा असे सुचविले.तसेच त्यांचे पाथरीचे कुलकर्णी वतन त्यांच्याकडे परत करण्याबाबत विनंती केली.त्यानुसार पाथरी अहमदनगर राजवटीकडे समर्पित करण्याबाबत बुऱ्हाण निजाम शहाने अलाउद्दीन इमाद शहकडे प्रस्ताव पाठविला.त्याबदल्यात समृद्ध असा परगणा देण्यास त्याने तयारी दर्शविली.तथापि अलाउद्दीन इमाद शहाने हा प्रस्ताव अमान्य करून आपल्या या कृतीचा होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन पाथरी गावाभावती तटबंदी करण्यास प्रारंभ केला.इमाद शहाने बु-हाण निजाम शाहच्या हरकतीकडे कानाडोळा केला. बु-हाण निजाम शहाणे देखील युद्धाची तयारी केली.सन १५१८ मध्ये बु-हाण निजाम शहाला दौलताबाद आणि वेरुळच्या लेण्यांचा आनंद लुटण्यास जायचे आहे, असा बहाणा करून मुकम्मल खानाने मोठया सैन्यासह दौलाताबादकडे सावकाशप्रमाणे प्रयाण केले.हा बहाणा चांगलाच यशस्वी ठरून त्यामधून पाथरीवर हल्ला करण्याची संधी घेतली.पाथरीवरील अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये मुकम्मल खान विजयी होऊन पाथरी किल्ल्याच्या अहमदनगरच्या फौजा चढून गेल्या.त्यांनी पाथरी किल्ल्याबरोबर संपूर्ण पाथरी परगणा ताब्यात घेतला. किल्ल्याचा ताबा त्याने मिया महमद घोरी ह्या आपल्या अधिकाऱ्याकडे सोपविला.

या अधिका-याला त्याने कामिल खान हि पदवी दिली आणि त्याच्याकडे त्याने पाथरी परगण्याचा कारभार पाहण्याचे काम ही सोपवले अहमदनगरच्या ताब्यातून किल्ला जिंकून घेण्यास सामर्थ्य नसल्यामुळे अल्लुउद्दिन इमाद शहाला अहमदनगरविरुद्ध कोणत्याही प्रकारची हालचाल करता आला नाही.इ.स.१५२४ मध्ये अह्मदनगरच्या आणि विजापुर राज्यांत सोलापूरच्या प्रश्नावरून वैमनस्य आले. अहमदनगरने वऱ्हाड आणि बिदर या राज्यांच्या सुलतानांकडे मदतीची विनंती केली. झालेल्या युद्धात विजापुरच्या फौजांना विजय प्राप्त झाला आणि वऱ्हाड,अहमदनगर आणि बिदर यांच्या फौजांना रणांगणातून पळ काढावा लागला. इस्माईल आदिल शहाने गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला पाथरीवर हल्लाकरण्याची चिथावणी दिली.कुतुबशहा आणि इमाद शहायांनी पाथरीवर हल्ला केला आणि अहमदनगरच्या फौजांचा पराभव करून पाथरीचा किल्ला आणि गाव आपल्या ताब्यात घेतले इ.स.१५२७ इमाद शहाला अर्थातच पाथरीवर फार काळ ताबा ठेवता आला नाही.बुऱ्हाण निजाम शहाला हि बातमी कळतच त्याने बरीद शहाबरोबर संगनमत केले आणि दोघांच्या फौजांनी पाथरीवर हल्ला करून एक महिन्याच्या वेढयानंतर पाथरी जिंकून घेण्यात यश मिळविले. या वेढयात निजामशाही सैन्याने तोफांचा प्रचंड भडीमार करून पाथरीची मजबुत तटबंदी उद्धवस्त केली. पुन्हा एकदा अहमदनगरच्या ताब्यात पाथरी गाव आणि पाथरी परगणा आला.या परागाण्यावर बुऱ्हाण निजाम शहाने आपल्या एका नातेवाईकाची नेमणुक करण्यात केली.१५५३ मध्ये बुऱ्हाण निजाम शहाचा मृत्यू झाला व हुसेन निजामशहा (तिम्मभटांचा वंश) अहमदनगरच्या गादीवर आला.६ जुन १५६५ मध्ये हुसेन निजाम शहाचा मृत्यु होवून त्याचा मुलगा मुर्तजा निजामशहा(तिम्मभटांचा वंश) गादीवर आला.इ.स.१५७२ मध्ये वऱ्हाडाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा तोंड फुटले.अहमदनगरचा वजीर चेंगीज खान याने मुर्तजा निजाम शहा आणि अली आदिलशहा यांची भेट घडवून आणली.या भेटीत असे ठरले होते की, निजाम शहाने वऱ्हाडाने बिदर राज्य जिंकून घ्यावेत आणि अली आदिलशहाने या दोन्ही राज्यांच्या मुलुखाचा जो वसुल होता तितकाच वसुल देणारा विजय नगरच्या राज्याच्या मुलुक जिंकून ध्यावा दोन्ही राज्यात झालेला हा तह केवळ आपल्या राज्याच्या सीमा वाढविण्याच्या स्वार्थी हेतूने झाला होता.तहाप्रमाणे मुर्तजा निजाम शहाने त्याच वर्षी अहमदनगरहुन कुच करून पाथरी येथे मुक्काम केला आणि तेथुन वऱ्हाडावर स्वारी करण्याची तयारी सुरु केली. त्याने तुफानखाना कडे बुऱ्हाण इमाद शहाची ताबडतोब सुटका करावी असा निरोप पाठविला. अन्यथा वऱ्हाडावर स्वारी करण्यात येईल अशी धमकीही दिली होती.

तथापी तुफान खानाने दमकावनीची दखल घेतली नाही. मुर्तजा निजाम शहाला हि बातमीकळताच त्याने पाथरीहून कूच केली. अहमदनगरच्या फौजा पाथरीत शिरल्या तेव्हा तेथील सर्व लोक आपला नाश होईल या भितीने पाथरी सोडून आजुबाजुच्या जंगलात पळवून गेलेले होते.चेंगीज खानाने त्यांना सर्व त-हेचे पत्रे लिहून आणि आश्वासने देवून परत बोलावुन घेतले.त्यानंतर मुर्तजा निजाम शहाने पाथरी जिल्हा आपल्या अधिका-यामध्ये वाटुन दिला. अहमदनगरच्या मुर्तजा निजाम शहाने वऱ्हाडातील इमाजद शाहीचा पुर्ण पराभव केला.व १५७४ मध्ये व-हाडातील इमादात शाही पुर्णपणे संपुष्टात आणली अशा प्रकारे व-हाड अहमदनगरच्या निजामशाही राज्यांच्या काही कालावधीसाठी एक अविभाज्य घटक बनला. जवळ जवळ २२वर्ष व-हाडावर निजामशाही घराण्याचे राज्य राहीले.त्यानंतर वऱ्हाड निजामाना तोडुन देण्यात आले.१४ जुन १५८८ रोजी मुर्तजा निजामशाहला त्याचा मुलगा मीरान हुसेन यांनी ठार मारले आणि स्वतःचा राज्याभिषक करून घेतला. परंतु त्याच्या दोन महिन्याच्या आताच खुन झाला त्यावर अहमदनगरच्या अमिरांनी मुर्तजाचा भाऊ बु-हाण याचा मुलगा इस्माईल याला गादीवर बसविले.अहमदनगरच्या राजघराण्यातील सर्वसूत्रे जमाल खान याच्याकडे आले होती.विजापुरच्या अदिलशहा व बु-हाण शहा यांच्याशी लढताना विजापुरच्या फौजांनी काही काळ जलालखानला पाथरी येथे कोंडले होते. काही काळानंतर जालालखानाने बु-हाणशाहवर हल्ला करण्याचे ठरविले. दोन्ही फौजांची लढाई रोहीनखेड घाटाखाली(जि बुलढाणा) येथे झाली. यात गोळी लागून जलाल खान ठार झाला. यानंतर मोगलांच्या फौजांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी गाव जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.परंतू झालेल्या लढाईत अहमदनगरच्या फौजांनी मोगल अधिकारी खान-ई -खानाने याचा सोनपेठ ८ फेब्रुवारी १५९७ रोजी पराभव केला परंतु त्याने आपल्या फौजांची जमावाजमव केली आणि अहमदनगर व अहमदनगरच्या मदतीला आलेल्या गोवळकोडा आणि विजापुर यांच्या फौजांचा ही पराभव केला.१८ ऑगस्ट १६०० मध्ये अहमदनगरचे राज्य मोगलांच्या ताब्यात गेले नंतर त्यांनी वऱ्हाडाची विभागणी १६ सरकारात(महसुल विभागात) केली होती.आणि या मध्ये साधारण १४२ परागण्यचा समावेश केला होता.एकूण सरकारापैकी पाथरी सरकारात १८ परगणे होते आणि एकूण महसुल ८०,८०५,९५४ दाम ठेवण्यात आलेला होता.त्या पैकी ११,५८०,९५४, इतके दाम फौजफाटा सांभाळण्यासाठी नेमणूक देण्यात आलेले होते.या १८ परागण्यात पुढील परगणे होती.अर्धापूर,पाथरी,परभणी,पांचाळगाव,बल्होर,बसमतबार,टाकळी ,जिंतूर, झरी, सेवली,कोसारी,लुह्गाव(लोहगाव ),मकत,मूढखेड,मातरगाव,नांदेड,वसा आणी हटा

औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अहमदनगर या जिल्ह्याचा समावेश होतो.
१६३० मधे व-हाडात अभूतपूर्व दुष्काळ व रोगराईने धुमाकूळ घातला नंतर सिद्धखेड येथील निजाम शहाचा सरदार लखुजी जाधवराव मोगलांना जावून मिळाले.मुर्तजा निजामशाहने दौलताबाद येथे त्यांच्या नातेवाईका सह खून करून घेतला.याचा परिणाम शहाजीराजे भोसले मोगलांना जावून मिळाले व पावसाळा संपताच मुर्तजा निजाम शहा व जहान खान यांच्या विरुद्ध चाल करण्याची तयारी केली.हि बातमी कळताच मुर्तजा निजाम शहा व खान जहानने १६२९ मध्ये पाथरीच्या दिशेने पळ काढला.त्यानंतर मोगलांच्या सैन्याने दौलताबादवर चाल केली आणि १६३३ च्या जानेवारी मध्ये दौलताबादला वेढा दिला.वेढा सहा महिने चालला शेवटी ७ जुन १६३३ मध्ये किल्ल्याचा पाढव झाला.मुर्तजा निजामशहाच्या खुना नंतर गादीवर आलेल्या हुसेनशहा याला ग्वाल्हेर येथे कैद ठेवण्यात आले.अशा प्रकारे अहमदनगरच्या निजामाशाही घराण्याचे राज्य संपुष्टात आले आणि वऱ्हाडावर अनुषंगाने परभणीवर असलेले अहमदनगर निजामशाही अंमल संपुष्टात आला.
या दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाने स्फूर्ती दायक वळण प्राप्त झाले.सन १६७० च्या डिसेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी वऱ्हाडातील कारंजा हे अतिशय संपन्न शहर लुटले.मराठा मोगल संघर्षाला खरी धार आली ती छत्रपती संभाजींच्या मृत्यू नंतर ती १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांचे दक्षिणेतील प्रत्यक्ष सार्वभौमत्व नाहीशे झाले आणि मोगल सम्राटातर्फे जे सुभेदार नेमले गेले त्यांची सत्ता चालु झाली.या मध्ये हैद्राबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक आसफ जाहा याचा उल्लेख करावा लागेल.या काळात परभणी जिल्ह्याचा समावेश वऱ्हाडातील पाथरी व वासीम सरकार मध्ये होता.या परगण्याची यादी पुढील प्रमाणे आहे. पाथरी सरकार:-१.पाथरी २.माहूर ३.भोगाव ४.अंजेगाव ५.परभणी ६.टाकळी ७.झरी ८.जिंतूर ९.सेवली १०.कोठेली ११.लोहगावहैद्राबादच्या गादीवर सलाबत जंग आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत गंगाखेड येथील राजे रघोत्तमराव गंगाखेडकर यांच्या घराण्याचे निजाम राजवटीवर महत्वाचे स्थान होते.राजे रघोत्तमराव १७९६ ते १८०४ पर्यंत निजामाचे मुख्य सचिव होते.

इंग्रजा विरुद्धी कारस्थानामुळे इंग्रजांच्या सुचनेनुसार त्यांना पदभ्रष्ट करण्यात आले.येरवी त्याच्यावर निजामाची मर्जी होती.त्याबद्दल त्यांना गंगाखेडची जहागीरी बहाल करण्यात आली होती त्यांचे वंशज अध्यापही गंगाखेडला असुन त्यांचा राजे असा उल्लेख करतात.
पुढे इंग्रज हैदराबादच्या निजामास या ना त्या स्वरुपात अडचणीत आणून विविध तह करत व आपला स्वार्थ सादत होते.त्याचा एक भाग इंग्रजी व निजाम यांच्या मध्ये १८५३ मध्ये झालेल्या ऐतहासिक तहानुसार एकूण ५० लाख रुपये महसुली उत्पननाचे जिल्हे इंग्रजी सत्येला देवुन टाकले पुढे निजामाकडील वऱ्हाडाचा अल्पसा उर्ववरित प्रदेश आणि गोदावरीच्या दक्षिणे कडील काही तालुके तसेच परतुर एकत्र करून सालारजंगने परभणी जिल्हा निर्माण केला.

 
 
     
     
     
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती :www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.