पाथरीच्या नैऋत्येस सुमारे १४ कि.मी.अंतरावर असून ते गोदावरी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर बसलेले आहे.पुर्वभुमिख वाहणारी गोदावरी येथे दक्षिणाभिमुख वाहते.गोदावरीच्या परिसरातील गावाजवळील भाग अतिशय निसर्गरम्य आहे.गुंज हे मराठवाड्यातील सुप्रसिद्ध दत्तात्रय देवस्थान असून श्री पं.पू.संत गांडा महाराज उर्फ योगानंद सरस्वती महाराज ह्यांची कर्मभुमी आहे.

श्री पं.पू.योगानंद महाराजांचा जन्म शके १७९० (इ.स. १८६८ ) मध्ये गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यातील तालंगपुर या गावी दत्तजयंतीच्या दिवशी झाला.वडिलांचे नाव-डाह्याभाई देसाई व आईचे नाव -काशीबाई महाराजांचे जन्मगाव कल्याणभाई देसाई होते.नवसाने झालेल्या मुलास दृष्ट लागु नये म्हणून आई-वडिलांनी त्याचे गांडा (वेडा) म्हणून हाक मारू लागले.व तेच नाव प्रचलित झाले.लहानपणापासुन शिवभक्तीचा जिव्हाळा अंतःकरणातून असल्यामुळे नोकरी,व्यापार कशातच त्यांचे लक्ष लागले नाही.वयात येताच आई-वडिलांनी त्यांचे लग्न लावुन दिले.परंतु त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली म्हणून गृहत्याग केला.सद्गुरूच्या शोधात फिरत असताना नाशिक येथे आले तेथे त्यांची भगवान त्रिमूर्ती दत्तात्र्यांच्या अंशावतार अशी ख्याती असलेल्या श्री पं.पू.वासुदेवानंद सरस्वतीय स्वामीचा अनुग्रह घेतला.त्यांचे गुरु श्री पं.पू.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज गुजरात मधील नर्मदा तिरावरील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे जेष्ठ वध्य ३० शके १८३६ मंगळवार इ.स.२४-६-१९१४ रात्री ११:३० वाजता (वयाच्या ६० व्या वर्षी) समाधीस्त झाले.त्यानंतर श्री पं.पू.गांडा महाराजांनी संन्यास घेतला व पुढे योगानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.श्री पं.पू.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज समाधिस्त होण्यापूर्वी श्री महाराजांनी सन्यास घेवून मराठवाड्यातील दक्षिणप्रांती जाण्याची आज्ञा दिली.त्या प्रमाणे यति दीक्षा(सन्यास) घेवून सात वर्ष मराठवाड्यात विविध ठिकाणी भ्रमण करीत राहील.या भ्रमंतीत त्यांनी प्रवचने करून लोकांना अध्यात्माची शिकवण दिली.पुढे फिरत फिरत परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी राहिले.बऱ्याच ठिकाणी त्यांनी दत्त मंदिराची स्थापना केली.पाथरीला त्यांची श्री पंडितराव चौधरीशी भेट झाली.गुंज हे गाव त्यांच्या देखरेखी खाली होते.चौधरीनी त्यांना गुंज येथे वास्तव्य करण्याची विनंती केली १८४४ साली व गुंजाच्या रम्य परिसरात श्री पं.पू.योगानंद सरस्वतीच्या चिंतनशील व्यक्तिमत्वाला अधिष्ठान लाभले.त्यावेळी त्यांची श्री सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले.तेथे त्यांनी मठाची स्थापना करून दत्तउपासणेपासुन प्रारंभ केला.येथे असतांना कित्येक लोकांना अनुग्रह देवून सद्गुरु सेवा व दत्तभक्तीस लावून त्यांचे कल्याण केले.येथे त्यांनी खेचरी मुद्रेची विद्या ग्रहण केली.जिभेच्या खालचा भाग कापला असता ती बरीच बाहेर काडता येते या प्रकारास खेचरी मुद्रा विद्या असे म्हणतात.ते रोज सकाळी या प्रमाणे जिभ बाहेर काढून स्वछ करीत असत.त्या काळात त्यांनी गुरु वासुदेवानंद चरित्र,अज्ञान तिमिर दीपक ,स्त्री धर्म निरुपण व पुरुषधर्म निरुपण इत्यादी ग्रंथ लिहिले.गांडा महाराजांच्या दैवी शक्ती प्राप्त होती त्यांच्या चरित्रकथेमध्ये बऱ्याच चमत्कारांचा उल्लेख आहे.त्यांनी अशक्य रोग बरे केले.असे सांगतात इ.स.१९२४ च्या भयंकर दुष्काळात त्यांनी पर्जन्यवृष्टी केली असा उल्लेख आढळतो.

वयाच्या साठव्या वर्षी म्हणजे फाल्गुन वध्य द्वादशी शके १८५० (इ.स.१९२८ ) या दिवशी श्री पं.पू.गांडा महाराज उर्फ योगानंद सरस्वती महाराज समाधिस्त झाले.त्यांच्या देहास गोदावरीमधील कमलजा ह्या खोल डोहात जलसमाधी देण्यात आली.त्या वेळेस श्रीसिद्धेश्वर महादेवाचे मंदिर व त्या खालील दोन्ही बाजूकडील दोन लादण्यास उपलब्ध होत्या त्या नंतर संस्थानच्या कारभाराची सूत्रे श्री.पं.पू.योगानंद महाराजांचे पट्टशिष्य श्री पं.पू.चिंतामणी महाराज यांच्या हाती आला.त्यांनी संस्थानाची अत्यंत भरभराट करून सर्व बांधकाम अति दिर्घ प्रयत्नांनी व कसोटीने केले.जे आज भव्य स्वरुपात उभारलेले दिसत आहे ते सर्व काम श्री पं.पू.चिंतामणी महाराजाकडून मिळालेल्या आशीर्वादाचे फळ आहे.मंदिराच्या मध्यभागी श्री दत्तात्रयाची भव्य मुर्ती असून मूर्तीच्या उजव्या बाजुस श्री पं.पू.वासुदेवानंद सरस्वती महाराजाचा मुखवटा आहे.श्री दत्त मुर्तीचे दक्षिणेकडून श्री पं.पू.योगानंद सरस्वती स्वामी महाराजाचा फोटो आहे.तसेच श्री दत्त मुर्तीच्या समोर परमपुज्य चिंतामणी महाराजांची मुर्ती आहे.पुढे भव्य सभा मंडप असून सभामंडपाताचे उत्तरेकडील लादणीत श्री योगानंद महाराजाचे विश्रांती स्थान असून तेथे श्री महाराजाची समाधी करून चरण मुद्रा व मुखवटा असून त्या पाठीमागे पूर्ण स्वरुपाची मुर्ती स्थापन केलेली आहे.त्या प्रमाणे सभामंडपाच्या दक्षिणेकडील भागात परमपूज्य सद्गुरु चिंतामणी महाराजांची स्फटिकाची भव्य मुर्ती स्थापन केलेली आहे.उत्तरेस उंचवट्यावर श्री सिद्धेश्वर महाराजाचे मंदिर असून सभामंडपाच्या पुढच्या भागात राहण्यासाठी खोल्या काढल्या आहेत.या सभामंडपात श्री गुरुचरित्र कथा चित्रमय स्वरुपात सभामंडपात लावल्याने त्याची भव्यता अजून वाढलेली दिसते.पुढे महाद्वार असून खाली दक्षिणेकडे भव्य स्वरुपात भक्तांना राहण्यासाठी अद्यावत पद्धतीने भक्त निवास असून हि वास्तु परमपूज्य छन्नुभाई महाराजाच्या प्रेरणेने तयार झालेली असून विस्तार पावत आहे.त्यापुढे गंगेच्या काठावर घाट बांधलेला असून घाटालगतच दक्षिण वाहिनी गंगेचे विस्तीर्ण पात्र आहे.याच पत्रात प्रतिवर्षी मोठया उत्सवाच्या वेळीयात्रा भरते.श्री क्षेत्र गुंज येथे होणारे वार्षिक उत्सव :प्रतिवर्षी फाल्गुन वध्य १२व १३हे श्री योगानंद महाराजांचे पुण्यतिथी उत्सवाने मुख्य दिवस आहेत .त्या अगोदर सात दिवस नाम सप्ताह व पालखीतून देवाची मिरवणूक काढतात .उत्सवात पालखी देवळाच्या भोवती मिरवतात .शेवटच्या दिवशी म्हणजे त्रयोदिवशीला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगेच्या काठावर श्री महाराजाच्या पादुका व निशाण येथे पालखी नेउन पंचपदी करतात .पाड्व्याच्या दिवशी प्रक्षाल पूजा करून देवळाच्या आवारात पालखी मिरवितात .

याच प्रमाणे प्रतिवर्षी माघ वध्य .४रोजी परमपूज समर्थ चिंतामनी महाराजांचा पुण्यस्मृती दिनी भक्त गण मोठया संख्येने जमून गुंजेस साजरा करतात .या शिवाय दत्तजयंत निमित सात दिवस नामसप्ताह करून जयंतीचे दिवस श्रीदत्त मूर्तीवर व श्री योगानंद महाराजाच्या मूर्तीवर गुलाल उधळून जन्मोउत्सव साजरा करतात श्री योगानंद महाराजांच्या जन्मदिवस हि श्री दत्त जयंती हा आहे .दुसरे दिवशी पारणा करून पालखी देवळाच्या आवारात मिरवितात .या शिवाय दर गुरुवारी पालखी देवळाच्या प्रदक्षिणा करून भजन पंचपदी केली जाते .या शिवाय महाशिवरात्रीचे दिवशी रात्री महादेवास व श्री दत्तत्रेयास यम पूजा अभिषेक करून दुसरे दिवशी पारणा केली जाते आषाढ शुद्ध प्रतिपदेस श्रीमतप.पू.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी होते व दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास्या निमित्त श्रीदत्त मुर्तीस अतिरुद्र अभिषेक सव्वा दोन महिने करतात.त्याच प्रमाणे श्रावण वद्य.पंचमीस श्रीमत प.पू.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा जन्मोत्सव करतात व श्रावण वध्य अष्टमीस (गोकुळ अष्टमी) परमपूज्य समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराजांचा जन्मोत्सव भक्तगण श्रीक्षेत्र गुंजेस जमून मोठ्या थाटात साजरा करतात.अतिरुद्र अभिषेकाची समाप्ती झाल्यावर श्रीसिद्धेश्वर महादेवास महारुद्र अभिषेक करतात
.श्रीक्षेत्र गुंज येथे होणारे दैनंदिन कार्यक्रम:-सकाळी प्रातः समयी गंगा स्नान करुन भूपाळ्या व काकड आरती व त्रीपदी भजन होते लगेच सूर्योदया नंतर रुद्राभिषेक व देवास नैवेद्य दाखवून आरती होते.नऊ वाजल्या पासून बारा वाजेपर्यंत सर्व ठिकाणी अभिषेक व पुजा करून ठीक बारा वाजता महानैवेद्य दाखवून मंगल वाद्याच्या गजरात आरती करतात या नंतर चार वाजे पर्यंत मंदिर बंद राहील.चार वाजल्या पासुन पाच वाजे पर्यंत एक तास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नाम मंत्राचा सर्व भाविक जप करून त्याची सांगता परमपुज्य श्री चिंतामणी महाराजांच्या पुण्यस्मृति दिनी करतात.सायंकाळी प्रदोष पुजा ,अभिषेक व शांतीपाठ होतो.यानंतर सभामंडपात परमपूज्य रंगावधुत महाराज कृत दत्तबावणीचा पाठ होतो व त्यानंतर पंचपदी करून शेजाआरती झाल्यावर पडदे सोडतात.

 

श्री महाविष्णु देवस्थान गुंज :-श्री क्षेत्र गुंज येथे श्री .श्री १००८ महात्माजी महाराज व त्यांचे परमभक्त राम महाराज यांचे मंदिर असून गोशाळाप्रसिद्ध आहे.

 

गोंडगावाची देवी:- श्री क्षेत्र गुंज पासून ३कि.मी.अंतरावर देवीचे मंदिर असून हे जागृत देवस्थान आहे.

 
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती:www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.